Police Action । किरायाने घर घेतलं अन् तिथेच सुरू केला 'सुगंधित तंबाखूचा' धंदा

March 31, 2026 by Prakash Hande

Ghuggus Police Action : चंद्रपूर - वर्ष २०१२ पासून संपूर्ण राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू आजही सर्रासपणे चंद्रपूर जिल्ह्यात विकला जात आहे, नवं तरुणांना कॅन्सर सारखा दुर्धर आजार फक्त २० रुपयात उपलब्ध करून देणारा ह्या सुगंधित तंबाखूने जिल्ह्यात चांगलाच जम बसविला आहे.  (नौदल जवानाने प्रेयसीचे केले तुकडे)

 

चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस पोलीस स्टेशनच्या हद्दीत २४ वर्षीय युवकाने आपल्या घरात अवैधरित्या सुगंधित तंबाखूची साठवणूक करीत त्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकत लाखोंचा सुगंधित तंबाखू जप्त केला.

 

घुग्गुस शहरातील आमराई वॉर्डात फौजी यांच्याघरी किरायाने राहणारा मोनू सुगंधित तंबाखूची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, माहिती मिळाल्यावर पोलिसांनी ३० मार्चला आमराई वॉर्डात धडक दिली. पोलिसांनी यावेळी आवाज दिला असता तिथे मोनू नावाचा मुलगा आला. त्याला विश्वासात घेत पोलिसांनी घराची झडती घेतली.

 

पोलिसांना यावेळी किचन रूममध्ये दोन प्लॅस्टिक चुंगडीत मजा १०८ कंपनीचा सुगंधित तंबाखू एकूण किंमत १ लाख ५ हजार ४५० रुपयांचा साठा आढळला, आरोपी मोनू ची विचारपूस केली असता त्याने आपले नाव २४ वर्षीय मोहम्मद शहानवाज रफिक अहमद शेख उर्फ मोनू असे सांगितले. मोनू हा जिल्हा फतेहपूर राज्य उत्तर प्रदेश मधील निवासी असून तो हल्ली घुग्गुस मध्ये राहत होता. Illegal Gutkha Seized

पोलिसांनी आरोपीवर कलम १२३, २२३, २७४, २७५ सहकालम २६(२), ३०(२), ३,४,५ व ९ (१) अन्नसुरक्षा मानके कायदा कायदा २००६ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली.  पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.

Leave a Comment

+