चिमूर: शिरपूर रोडवर भीषण अपघात, खांबाला धडकून कार दुचाकीवर पलटली

May 11, 2026 by Prakash Hande

चिमूर - यवतमाळ मधील काही तरुण चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील गावोगावी जात गॅस दुरुस्तीचे कामे करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, १० मे रोजी नेहमीप्रमाणे गॅस दुरुस्तीच्या कामासाठी निघाले असता एका चारचाकी वाहनाने बेदरकारपणे वाहन चालवीत एकाचा जीव घेतला. याबाबत चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली. (वर्ग दहावीमध्ये ५६ टक्के मिळाले,कपडे वाळविताना विजेचा धक्का लागला)

 

४० वर्षीय संजय आनंदराव शिंदे राहणार पिंपळशेंडा तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ व चुलत भाऊ ४० वर्षीय अर्जुन अंबादास शिंदे व नातेवाईक २३ वर्षीय उमेश रमेश लकस, २४ वर्षीय रोहित रामाजी इंगोले सर्व राहणार पिंपळशेंडा यवतमाळ हे सर्व गावोगावी जात गॅस दुरुस्तीचे काम करतात.

 

१० मे रोजी नेहमीप्रमाणे चौघेजण आपल्या दुचाकी वाहनाने कुरखेडा जिल्हा गडचिरोली मध्ये जात होते, अर्जुन शिंदे हेल्मेट परिधान करीत आपल्या दुचाकी वाहन क्रमांक MH २९ CK ०१३७ ने जात होता, दुपारी ३ वाजतादरम्यान शिरपूर रोडवरील घाटाजवळ वळणावरून जात असताना शिरपूर कडून येणारे चारचाकी वाहन क्रमांक MH ३६ AL ५०७४ वेगात एका रेडियमच्या खांबाला धडकत अर्जुन च्या दुचाकीला धडक दिली.

अर्जुन दुचाकीसह रस्त्यावर पडला, तितक्यात चारचाकी वाहन त्याच्या अंगावर पडले, अपघात घडल्यावर नातेवाईक व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी अर्जुन ला बाहेर काढले, त्याला तात्काळ चिमूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान अर्जुन चा मृत्यू झाला.

 

संजय शिंदे यांनी अपघाताला जबाबदार चारचाकी वाहन चालक ३१ वर्षीय प्रीतम वामन कामथे विरोधात चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, चिमूर पोलिसांनी आरोपी वाहन चालकावर मोटार वाहन अधिनियम १९८८ अनव्ये कलम १८४, बीएनएस कलम १०६ (१) व २८१ अनव्ये गुन्हा दाखल केला. 

Leave a Comment

+