चिमूर (भिसी) - भिसी चौरस्त्यावरील पेट्रोल पंपावरून चारचाकी वाहन चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून यासंदर्भात भिसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (चंद्रपुरात ११ किलो गांजा जप्त)
३६ वर्षीय सौरभ मुंगले हे खाजगी व्यवसाय करतात त्यांच्याकडे मारोती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची ओमनी क्रमांक MH २७ H ७४६५ असून ते या वाहनाद्वारे साहित्य आणण्याचे काम करतात, ४ मे रोजी वाहनचालक दिलीप टापरे हा वाहन घेऊन उमरेड ला ट्रकचे सामान आणण्यासाठी गेला होता, सायंकाळी ४ वाजता चालक वाहन घेऊन आला. सदर वाहन फिर्यादी यांचे काका धनराज मुंगले यांच्या भिसी चौरस्त्यावरील पेट्रोल पंपावर ठेवली. वाहनांची चाबी पंप कार्यालयात ठेवत चालक घरी गेला.
७ मे रोजी सौरभ ला ट्रकचे डायर आणण्यासाठी बाहेरगावी जायचे होते, त्याकरिता वाहनांची आवश्यकता असल्याने तो पेट्रोल पंपावर गेला, मात्र त्याठिकाणी ओमनी वाहन दिसून आले नाही. वाहनाचा सर्वत्र शोध घेण्यात आला, पण ती कुठेही आढळून न आल्याने सौरभ यांनी १० मे रोजी भिसी पोलीस स्टेशनमध्ये वाहन चोरीची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे.
Leave a Comment