Chandrapur Petrol Shortage Rumors : चंद्रपूर - शहरातील इंधनाचा साठा संपणार अशी माहिती आज चंद्रपुरात वेगाने पसरली आणि नागरिकांनी सर्व पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली, मात्र शहरात मुबलक प्रमाणात इंधनाचा साठा असल्याची माहिती जारी केली आहे, नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले आहे. (ओबीसींची केंद्र सरकारने केली फसवणूक)
युद्ध सुरु असल्याने इंधनाचा साठा संपणार, वाहने रस्त्यावर थांबतील अशी अफवा आज शहरात पसरली, त्यामुळे शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी उसळली.
प्रशासनाचे आवाहन - आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नाही. नागरिकांनी उगाच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.
जिल्ह्यात पेट्रोल डिझेल टंचाई बाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तसेच विनाकारण पेट्रोल पंप वर गर्दी करू नये. पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळावी असेही प्रशासनाने कळविले आहे.
Leave a Comment