Chandrapur Mayor Candidate BJP : चंद्रपूर - महापौर पदावरून कांग्रेस पक्षात वाद सुरु आहे, महापौर व गटनेता कुणाचा यावर कांग्रेस पक्षात एकमत नाही मात्र भारतीय जनता पार्टीने कसलाही वाद न करता महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर केले. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत महापौर व उपमहापौर पदांबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. या बैठकीतील ठरावानुसार भाजपच्या महापौर पदाचा उमेदवार अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थक सौ. संगीता खांडेकर यांची महापौर पदाच्या उमेदवार म्हणून निश्चिती करण्यात आली आहे. यामुळे महापौर पद मुनगंटीवार गटाकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (कांग्रेसचा दिल्लीतील तोडगा फेल)
दरम्यान, उपमहापौर पद आमदार किशोर जोरगेवार समर्थक संजय कंचरलावार यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे महापौर पद मुनगंटीवार गटाकडे, तर उपमहापौर पद जोरगेवार गटाकडे अशी पदांची विभागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीच आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थक शेखर शेट्टी यांची भाजपच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे गटनेतेपद आणि उपमहापौर पद जोरगेवार गटाकडे राहणार असल्याने पक्षातील सामंजस्य आणि संतुलन साधण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या निर्णयामुळे महापालिकेत भाजपचे संघटन अधिक बळकट होणार असून आगामी काळात शहर विकासासाठी समन्वयाने काम केले जाईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
Leave a Comment