चंद्रपूरकरांचे डोळे पाणावले! लाडक्या दादांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेताना आमदार जोरगेवार भावनिक

February 04, 2026 by Prakash Hande

Ajit Pawar Asthi Kalash : चंद्रपूर - राज्याचे दिवंगत लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अस्थीकलश चंद्रपूर येथील श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आज अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अस्थीकलशाचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली अजितदादा कायम स्मरणात राहतील अश्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. (विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष राजीव कक्कडभारतीय जनता पार्टीचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारमहामंत्री नामदेव डाहुलेघुग्घुस नगर परिषदेचे नगरसेवक आशिष मासिरकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष चारुशिला बारसागडेकार्याध्यक्ष हेमांगिनी बिश्वासविधानसभा अध्यक्ष सुनील काळेयुवक अध्यक्ष अभिनव देशपांडेप्रतिमा ठाकूर तसेच भरत गुप्ता आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कीउपमुख्यमंत्री स्व. अजितदादा आज आपल्यात नाहीतहे वास्तव स्वीकारणे अत्यंत कठीण आहे. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे स्पष्टवक्तेपणाठाम निर्णयक्षमताप्रशासकीय अनुभव आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ ही अजितदादांची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

अजितदादांचे कार्य अत्यंत व्यापक व दूरदृष्टीपूर्ण होते. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ सत्तेपुरते मर्यादित न राहता लोकाभिमुखविकासकेंद्रित आणि निर्णयक्षम राजकारणाचा वेगळा आयाम निर्माण केला. प्रशासनावर असलेली पकडकामातील शिस्तस्पष्ट भूमिका आणि ठामपणा ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये होतीअशा भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केल्या. Ajit Pawar Asthi Kalash

त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते घडले आणि त्यांनी जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय व राबवलेली धोरणे आजही मार्गदर्शक ठरत असून त्यांनी केलेले भरीव कार्य महाराष्ट्राच्या राजकारणात कायम स्मरणात राहील. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अजितदादा पवार यांचे योगदान अजरामर असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

+