चंद्रपूर: OBC Caste Census साठी जनजागृती, वेंडलीतून मोहिमेला सुरुवात

May 12, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर -  राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे दिनांक ११ मे रोजी ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यासाठी ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे  यांच्या वेंडली ता. जिल्हा चंद्रपूर येथून ओबीसींची जनगणना करावी यासाठी जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली,  केंद्र सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसोबतच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात यासंदर्भात २२ जानेवारीला राजपत्र जारी केले, १ मे पासून स्व घर गणना सुरुवात झाली आहे १५ मे२०२६ पर्यंत आहे. आणि प्रगणक द्वारे मकान सूचीकरण १६ मे पासून सुरवात होत आहे, जनगणनेसंबंधी ३३ प्रश्नावली सूची जाहीर करण्यात आली आहे. बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा स्पष्ट उल्लेख करतानाच इतरांसाठी अन्य शब्दाचा वापर करण्यात आला. मात्र ओबीसींचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आल्याने जातनिहाय जनगणनेवरून प्रश्न निर्माण झाला आहे.  (बल्लारपूर ते मुंबई नव्या रेल्वे सेवेला मंजुरी)


देशाच्या विकासात कुणाचे किती योगदान आहे हे जाणून घेण्यासाठी कुणाची संख्या किती आहे ते समोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. ऑक्टोबर २०२६पासून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तर उर्वरित भागात फेब्रुवारी -मार्च २०२७पासून प्रत्यक्ष जनगणना सुरू करण्यात येणार असल्याचे १६ जून २०२५ला स्पष्ट करण्यात आले होते. नंतर रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांनी जनगणनेसंबंधी अधिसूचना २२ जानेवारीला जनगणना करण्यासाठी ३३ प्रश्नांची सूची तयार करून राजपत्रात समाविष्ट करण्यात आल्या. 

 

या सूचींमध्ये घर क्रमांक, जनगणना घर क्रमांक, सामग्री, घराची स्थिती, कुटुंब क्रमांक, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, त्याचे लिंग, विवाहित दाम्पत्यांची संख्या, घरातील खोल्यांची संख्या, पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत, पेयजलाची उपलब्धता, वीज, शौचालय, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, लॅपटॉप किंवा कम्प्युटर, मोबाइल, कार, मुख्य धान्य अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि जमातीचा उल्लेख करण्यात आला. इतरांसाठी अन्य शब्दाचा प्रयोग करताना ओबीसींचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आला आहे. 


राजपत्रातील बाराव्या सूचीत अनुसूचित जाती आणि जमातीच्या  कुटुंबातील प्रमुखाचा उल्लेख करताना ओबीसीसाठी अन्य शब्द वापरण्यात आला आहे. ओबीसी समाजाचा स्पष्ट उल्लेख कुठेही करण्यात आला नाही म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गावागावात जनजागृती अभियान सुरू केले आहे, या अभियानाची सुरुवात करताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे,संतोष झाडे,गोवर्धन पिंपळशेंडे, शंकर नागपुरे, रविंद्र पिंपळशेंडे ,ज्ञानेश्वर पिंपळशेंडे, दिपक पिंपळशेंडे, प्रकाश चालूरकर, निलेश चालूरकर, अविनाश टोंगे, उमेश श्रीरसागर आशिष देवालकर,हर्षल टोंगे, चंद्रशेखर देवालकर,शुभम दुरुतकर, हिमेश देवालकर, हिमांशु टोंगे ,उदय टोंगे, जीवन तुराणकर ,वर्षा मोहितकर, सुरेखा पिंपळशेंडे, करिष्मा टोंगे, गिरिजाबाई देवालकर, लक्ष्मीबाई पिंपळशेंडे, सरस्वती पिंपळशेंडे, शकुंतलाबाई पिंपळशेंडे, लताबाई टोंगे ,श्वेता टोंगे व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


 केंद्र सरकारने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी   जनगणना आयुक्तांनी भारत सरकारचे राजपत्र नाही काढल्यास येणाऱ्या हिवाळी अधिवेशन दरम्यान रामलीला मैदान नवी दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन करणार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

+