Maharashtra crime news : चंद्रपूर : जिल्ह्यात गोवंश तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आपली मोहीम तीव्र केली असून, ३० जानेवारी २०२६ रोजी नागभीड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मोठी कारवाई करण्यात आली. एका संशयित ट्रकमधून अत्यंत निर्दयतेने नेले जाणारे ३० गोवंश पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. (रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गोवंश वाहतूक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई)
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला माहिती मिळाली होती की, एका ट्रकमधून गोवंशाची अवैध वाहतूक केली जात आहे. या माहितीवरून नागभीड परिसरात सापळा रचून ट्रक क्र. CG-24-S-7667 अडवण्यात आला. ट्रकची झडती घेतली असता, त्यात ३० नग गोवंश (गाय, बैल व गोरे) दाटीवाटीने भरलेले आढळले. पोलिसांनी तात्काळ या गोवंशांची सुटका करून त्यांना सुरक्षिततेसाठी लाखनी (जि. भंडारा) येथील गोशाळेत रवाना केले आहे.
या कारवाईत पोलिसांनी ट्रक चालकासह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: १) प्रदीप बाळकृष्ण वाटघुरे (वय ३३, रा. देवरी, जि. गोंदिया) २) रिजवान अहमद अब्दुल रऊफ कुरेशी (वय २८, रा. दारव्हा, जि. यवतमाळ)
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानले जाणारे मोहम्मद जमील कुरेशी (रा. नागपूर) आणि मोहम्मद साकिब खान (रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. Maharashtra crime news
या छाप्यात पोलिसांनी एकूण ३२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये:
एक ट्रक (CG-24-S-7667)
३० नग गोवंश (गाय, बैल व गोरे)
दोन मोबाईल फोन
आरोपींविरुद्ध नागभीड पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्र. ६७/२०२६ नुसार प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा १९६०, महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा १९७६ (सुधारित २०१५) आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि उपविभाग ब्रम्हपुरीच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली
Leave a Comment