ब्रह्मपुरी - फाशी चौकात सुरु असलेल्या वैश्याव्यवसायावर पोलिसांनी धाड मारत एका महिलेची सुटका केली, हा अनैतिक व्यापार पती - पत्नी मिळून चालवीत होते, याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेचा पती फरार आहे. (पैसे मागितले म्हणून पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला)
ब्रह्मपुरी फाशी चौकात एका घरी वेश्या व्यवसाय चालतो अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी समाजसेविका व बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला, बनावट ग्राहकाला पैसे देत घरी पाठविले. घरी पोहोचताच ग्राहकाला हजर असलेली महिला दाखविण्यात आली.
महिलेची निवड केल्यावर ग्राहकाने दलाल महिलेला १ हजार रुपये दिले, त्यानंतर ग्राहकाने मोबाईलद्वारे पोलिसांना ok संदेश पाठविला. संदेश मिळताच पोलिसांनी त्या घरी छापा मारला. सदर वेश्याव्यवसाय हा प्रवीण भोयर व अंजली प्रवीण भोयर हे पती-पत्नी मिळून चालवीत होते. पोलिसांनी घराची झडती घेत एकूण २३ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
यावेळी हजर असलेल्या महिलेची विचारपूस केली असता तिने माहिती दिली कि पैश्याची अधिक अडचण असल्याने अंजली व प्रवीण यांनी मला वेश्याव्यवसाय करणेकामी बोलावीत होते, हजार रुपये ग्राहक देत असल्याने त्यापैकी ५०० मला व ५०० भोयर दाम्पत्याला मिळत होते. या कामासाठो भोयर दाम्पत्य स्वतःच्या घराचा वापर करीत होते.
पोलिसांनी अंजली प्रवीण भोयर व प्रवीण अनिल भोयर वर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५, ७ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून प्रवीण भोयरचा शोध पोलीस घेत आहे. यापूर्वी ब्रह्मपुरी शहरात माजी नगरसेवकांकडून वेश्याव्यवसाय वर पोलिसांनी छापेमारी कारवाई केली होती.
Leave a Comment