Missing Minor Girl । चंद्रपुरात मुली असुरक्षित? एकाच महिन्यात ३ मुलींनंतर आता १० वीतील विद्यार्थिनी बेपत्ता!

March 15, 2026 by Prakash Hande

Missing Minor Girl : चंद्रपूर - जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात एकाच महिन्यात ३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून आता असाच प्रकार गडचांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे, १० व्या वर्गात शिकणारी अल्पवयीन १५ वर्षीय मुलगी १४ मार्चला बेपत्ता झाली. याबाबत पालकांनी गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. (ब्रम्हपुरी तालुक्यात १५ दिवसात ३ अल्पवयीन मुली बेपत्ता) 

 

१५ वर्षीय मुलगी हि १० व्या वर्गात शिकते, १४ मार्चला सकाळी ८ वाजता अल्पवयीन मुलगी घरी अभ्यास करीत होती, वडील कामाला गेले होते तर घरी दुसरी मुलगी व आई घरी होती. दुपारी २ वाजता मुलगी घरी नव्हती. आईने मुलीचा शोध घेतला मात्र ती कुठेही मिळाली नाही, शेजारी महिलेच्या मोबाईलने कॉल केला असता मुलीकडे असलेला मोबाईल बंद होता.

 

दुपारच्या सुमारास वडील घरी आले असता ते म्हणाले कि दुपारी मला मुलीचा कॉल आला होता, मी बाहेरगावी गेली आहे असे सांगत तिने मोबाईल बंद केला. बराच कालावधी लोटल्यावर मुलगी घरी न आल्याने पालकांनी शेजारी व मैत्रिण व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती कुठेही मिळाली नाही.

 

मुलीला कुणीतरी अज्ञाताने फूस लावत पळवून नेल्याची शंका पालकांना आल्यावर त्यांनी तात्काळ गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, पोलिसांनी अज्ञात आरोपीवर १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Leave a Comment

+